इयत्ता १० वी व १२वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ !!
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०७ डिसेंबर) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत इ.१० वी व इ.१२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्याना बक्षीस वाटप योजना व इ.१२ वी नंतरचे ( प्रथम वर्ष ) वैद्यकीय अभ्यासक्रम (M.B.B.S, B.A.M.S ,B.H.M.S., B.D.S., B.U.M.S,) M.B.A. आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा या शाखांमधील उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य, महिलांना चारचाकी हलके वाहन (L.M.V.)(T.R.) चालविणेचे प्रशिक्षण देणे या योजनांचे अर्ज स्विकृतीसाठी दि.३१/१२/२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.तरी ज्याचे फॉर्म भरण्याचे राहिले असतील त्यांनी तातडीने फॉर्म भरण्यास घ्यावे, पूर्तता करून आता मुदतीपूर्वीच फॉर्म जमा करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे व भाजप उपाध्यक्ष शेखर चिंचवडे यांनी केली आहे.
सामान्य नागरिकांना सामान्य कुटुंबातील व्यक्तींना शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती नसते तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची ही माहिती सामान्य नागरिकांना नसते ती माहिती देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असते, तसेच प्रभागातील नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून नेहमीच नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे व भाजप उपाध्यक्ष शेखर चिंचवडे यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात याचाच एक भाग पिंपरी -चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळावा या हेतूने, सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.