शबनम न्यूज : पुणे (दि.०९ डिसेंबर) :- मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येरवडा (पुणे) येथे 2021-2022 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या ठिकाणी इ. 11 वी, 12 वी आणि पदविकापर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या 100 मागासवर्गीय मुलींना मोफत प्रवेश दिला जातो.
येथे प्रवेश होणाऱ्या विद्यार्थीनींना दरमहा 800 रुपये निर्वाहभत्ता तसेच स्वच्छतेसाठी 100 रुपये देण्यात येतात. प्रत्येक शैक्षणिक वर्षात शैक्षणिक साहित्यासाठी 4 हजार रुपये देण्यात येतात. त्याशिवाय शैक्षणिक सहल, गणवेश, प्रयोगशाळेसाठीचे ॲप्रन आणि प्रकल्पांसाठी (प्रोजेक्ट) शासन निर्णयातील तरतुदींप्रमाणे निधी, सुविधा देण्यात येते.
वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी तहसिलदारांच्या सहीचा उत्पन्नाचा दाखला, मागील वर्षाची गुणपत्रिका, जातीचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र आदींसह सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, पुणे (दूरध्वनी 020-29706611) अथवा गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, येरवडा पुणे 06 (भ्रमणध्वनी क्र. 9561568459) येथे संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.