शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ डिसेंबर) :- ‘ह’ प्रभाग अंतर्गत दापोडी,फुगेवाडी,कासरवाडी येथे महापालिकेच्या वतीने गोरगरीब दुकानदार,पथारीधारक व व्यवसायिक वर्ग यांच्यावर सर्रासपणे हिटलरशाही पद्धतीने अतिक्रमण कारवाई सुरू आहे.
Advertisement
एकीकडे कोरोना काळात आपले उद्योगधंदे गमावलेले गोरगरीब नागरिक छोटा-मोठा व्यवसाय असो वा भाजी विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत असताना महापालिकेच्यावतीने यांच्यावर हिटलरशाही पद्धतीने कारवाई सुरू आहे तरी कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने सर्वांची अधिकृत नोंदणी करून हॉकर्स झोनची निर्मिती करावी व त्यानंतरच अवैध व अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी श्री. निलेश हाके ह्यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. विकास ढाकणे यांच्याकडे करण्यात आली.
Advertisement