शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने आज सर्व देशात स्वच्छता दिन साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये अहोरात्र काम करणाऱ्या स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात व प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबत माजी उपमहापौर तूशार हिंगे, नगरसेवक बाबू नायर, सुजित आगरकर,अजित भालेराव, शिवदास हांडे उपस्थिती होते.
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या आयोजिका अनुराधा गोरखे यांनी प्रास्ताविक केले. यापसंगी सदाशिव खाडे यांनी आपले विचार मांडले, अमित गोरखे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी मनपा सेवेत असलेल्या 100 स्वच्छ्ता दूतांचा सन्मान करण्यात आला.