शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आज पिपंळे गुरव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर उपाध्यक्ष उज्वलाताई सुनील ढोरे यांच्या वतीने बापु गौरव सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी कॅग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे राष्ट्रवादी महिला कॉग्रेसचे शहराध्यक्षा वैशालीताई काळभोर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा बापु सन्मान २०२१ हा पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक मयुर कलाटे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, शिवाजी पाडुळे, रामोशी समाज पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुभाष जाधव, श्याम जगताप , तानाजी जवळकर अमर आदियाल आदी मान्यवर उपस्थित होते आयोजक सौ उज्वलाताई सुनील ढोरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरानां सन्मानित करण्यात आले.