शबनम न्यूज / पिंपरी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या प्रसंगी ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. व ३४७ नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी नगरसेवक राजाभाऊ बनसोडे,नगरसेविका स्वाती माई काटे, आयोजक सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता कांबळे (डोईफोडे) उपस्थित होते.
त्याठिकाणी आमदार आण्णा बनसोडे,महिला शहराध्यक्ष वैशालीताई काळभोर, नगरसेवक रोहित आप्पा काटे,युवक अध्यक्ष शेखर काटे यांनी शिबिरास भेट दिली.त्याप्रसंगी पिंपरी विधानसभा अध्यक्ष जन्नत सय्यद, कार्याध्यक्ष सरचिटणीस सुवर्णा काळभोर, प्रभाग अध्यक्ष फमिदा शेख,अंजली शिंदे,दिपाली केशी,मुन्ना परदेशी,अॅलेक्स दास,निशांत कामठे,आकाश नाटेकर,आकाश बोरावडे,सोमनाथ कामठे,सचिन शिंदे,गौतम कांबळे,राजेश केशी,मनोज गुठे, अमन नाटेकर,अंकुश वाघमारे,अमन संकनुर,सिद्धार्थ चटकंदी उपस्थित होते.