मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा-प्रतिक्षा घुले यांची मागणी
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.१० डिसेंबर) :- बोपखेल,रामनगर, गणेशनगर परीसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकुळ घातला आहे, रात्रीच्या वेळी नागरीकांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे, अनेक नागरिकांवर कुत्र्यांचे टोळके आक्रमण करत आहेत, तसेच कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनांमधेही वाढ होत आहे, त्यामुळे तत्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपरी युवतीसेनेच्या प्रमुख प्रतिक्षाताई घुले यांनी पशुवैद्यकिय अधिकारी डॅा.अरुण दगडे यांच्याकडे केली.
याप्रसंगी विभागसंघटिका मनिषा परांडे, विभागसंघटिका कामिनी मिश्रा, निला राजगुरू, विभागप्रमुख नामदेव घुले व विभागअधिकारी सनी कड उपस्थित होते.
Advertisement