शबनम न्यूज : चिखली (दि.१४ डिसेंबर ) :- माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने महाराष्ट्र युथ कार्निवलचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि शहराध्यक्ष यश साने यांनी दिली.
या स्पर्धेत १५ ते २५ वयोगटातील स्पर्धकांना सहभागी होता येईल. यामध्ये गायन, नृत्य, चित्रकला, मॉडेलिंग आदी स्पर्धा होणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना एकूण बक्षिसे २५ लाख रुपयांपेक्षा अधिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी www.nscmayoca.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन गव्हाणे आणि साने यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement