शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.२३ डिसेंबर) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक संजय वाबळे यांच्या संकल्पनेतून भोसरी, इंद्रायणीनगर येथील जलवायु विहार मैदानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी बाल जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.खाऊ गल्ली, मनोरंजनाचे खेळ आणि धमाल-मस्ती अशा वातावरणामध्ये भोसरी मध्ये चिमुकल्यांनी बालजत्रेची मजा अनुभवली.
यानिमित्ताने वैवाहिक सहजीवनाची 50 वर्षे पूर्ण करणाऱ्या दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला. तसेच कॉमेडीची सुरेली एक्सप्रेस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी आमदार विलास लांडे, माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक अजित गव्हाणे, उद्योग व व्यापार आघाडीचे शहर अध्यक्ष विजय पिरंगुटे, माजी नगरसेवक पंडित गवळी, ह भ प काशिद महाराज, माजी शिक्षण मंडळ सभापती श्रीरंग शिंदे, निवृत्ती शिंदे, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, कामगार नेते बाबा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी नाना नानी पार्क मित्र मंडळ, जय मल्हार ग्रुप, नवजीवन मित्र मंडळ, समता विकास मंडळ, युवा मित्र मंडळ, उत्कर्ष मित्र मंडळ ,अष्टविनायक मित्र मंडळ, त्रीवृक्ष संगम मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या रोजच्या दिनक्रमावर झाला. त्यांचे हसणे, बागडणे, मौजमजा घराच्या भिंतीत सीमित झाले होते. या मुलांना आवडीच्या खेळण्याची मजा मनसोक्त लुटता यावी, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.