शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव येथील प्रभाग क्रमांक ३४, ३५, ३६ मधील नागरिकांसाठी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शिव छत्रपती शिवाजी मित्र मंडळ व शिक्षण मंडळाच्या मा. सभापती व विद्यमान नगरसेविका मनिषा पवार यांच्या वतीने मंगळवारी (दि. १५) रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिर हे पडवळ नगर लेन नंबर २ , साई अंगण सोसायटी याठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या दरम्यान संपन्न झाले. या शिबिरामध्ये आरोग्यावर विविध मान्यवरांनी व्याख्यान दिले. तसेच यावेळी ४७ प्रकारच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये हृदय मेंदू रक्तवाहिन्यांत संबंधी रक्तातील साखर, पित्ताशय, मुत्रपिंड, फुफ्फुसाचे कार्य, हाडांचे आजार, आदी ४७ प्रकाराच्या आजारांबाबत तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरामध्ये डॉ. जय शहा व डॉ. राधिका शहा यांनी तपासणी व उपचार केले. या शिबिरात प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. तसेच यावेळी शिवछत्रपती शिवाजी मित्र मंडळाचे संस्थापक प्रमोद पवार व अध्यक्ष विनोद पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.