नागरीकांचा आधार कार्ड नोदंणीला चांगला प्रतिसाद
शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सुचनेनुसार आणी मा.नगसेवक शकंर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली
भारतीय जनता पार्टी पुनावळे शाखा व नवनाथ ढवळे मित्र परिवार यांच्या वतीने , पुनावळे येथील “अधिरा इंटरनॅशनल स्कूल” मध्ये नविन आधार कार्ड नोदंणी अभियानाचा शुभारंभ – युवा नेते चेतन पवार आणि कृषीनिष्ठ पुरस्कार विजेते सुनिल ढवळे यांच्या उपस्थितीत सपंन्न झाला.
या वेळी “अधिरा ईन्टरनॅशनल स्कूल” चे चेरमन नवनाथ मारुती ढवळे यांनी माोहिमे बद्दल माहिती दिली. पुनावळे – ताथवडे परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नविन आधार कार्ड नोदंणी मोहिम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सागींतले. सदर मोहिम शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस चालणार असून या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नवनाथ मारुती ढवळे यांनी केले. पहिल्याच दिवशी नागरीकांनी आधार कार्ड नोदंणीला चांगला प्रतिसाद दिला असून नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोहिमेध्ये नवीन आधार नोदंणी, मोबाईल नंबर बदलने, नावात दूरूस्ती, रहिवासी पत्ता बदलने, इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. अशी माहिती ही नवनाथ मारुती ढवळे यांनी दिली आहे.