शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१३ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सन 2022 मध्ये चार हजार रिक्त पदे नोकर भरती होणार आहे या नोकरभरतीत शासन निर्णयानुसार 80 टक्के स्थानिकांना नोकरी मिळावी याकरिता भाजपचे कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की
संदर्भ – १) शासन निर्णय क्रमांक स्था.लो.रो./२००८/प्र.क्र.९३/उद्योग-६, दिनांक १७ नोव्हेंबर, २००८ ,संदर्भ २) १४ डिसेंबर २०२१ चे नगरविकास मंत्रालयाचे निर्देश नुसार सन २०२२ मध्ये, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ४ हजार रिक्त पदावर नोकर भरती होणार आहे. त्याबाबत शासनाने संदर्भ २ अन्वये निर्देश दिले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका हि एक औद्योगिक अस्थापना असलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळे पर्यवेक्षकीय श्रेणीत किमान ५० टक्के व पर्यवेक्षकीय श्रेणीसहित इतर श्रेणीत किमान ८० टक्के स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. शासन नियमानुसार १५ वर्षे शहरात रहाणारा व्यक्ती स्थानिक म्हणून मानला जातो. यापूर्वीच्या झालेल्या नोकर भरतीबाबत सदंर्भ १ मध्ये नमुद केलेल्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करुन, स्थानिकांना डावलून नोकर भरती केलेली आहे. सदरची बाब स्थानिकांना अन्याय करणारी आहे. सदर बाबतीत किमान यापुढे शासनाच्या नियमाचे पालन करुनच २०२२ ची नोकर भरती व्हावी. अन्यथा याबाबत न्यायलयात दाद मागण्यात येईल.असे हनुमंत लांडगे यांनी या निवेदनात म्हटले आहे.