शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ जानेवारी) :- शहरातील अद्वैत शिंदे या आठ वर्षे वयाच्या लहान गिर्यारोहकाने आपल्या सहकाऱ्यांसोबत कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर केल्याबद्दल त्याचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर,जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. आठ वर्षे वयाच्या अद्वैत सोबत या गिर्यारोहकासमवेत अवधूत भोंडवे, गणेश वाजे, महेंद्र कुदळे, भूषण शिंदे, केतन कुंजीर, ओमकार स्वामी, मंगेश कोद्रे, राजेश ढोरे,मयूर पातुरडे, ऋत्विक लावरे यांनी नाशिक इगतपुरी मार्गावरील समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंचीचे महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर केले आहे. त्यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे कोरोना काळात प्लाझ्मादान, रक्तदानासाठी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संजय गायखे या सामाजिक कार्यकर्त्याचा तसेच अविनाश वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. हर्षदा तळपे या विद्यार्थिनीने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने वापरलेल्या मास्कचे निर्जंतुकीकरण करून मास्क नष्ट करण्याचे यंत्र बनविल्याबद्दल तिचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.