श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालयाची ‘टॅन्जंट’ एकांकिका पहिली
शबनम न्यूज ; पिंपरी चिंचवड (दि.१४ फेब्रुवारी) :- अ भा मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि श्रीमती चंदकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आयोजित २३ वी ‘कै राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा’ ११ फेब्रुवारी रोजी सुरू झाली. स्पर्धेचे उद्घाटन नेहमीच्या प्रथे प्रमाणे रंगमंचामागील कलाकार निरंजन बंडकर, ऋतुजा पारगे, प्रतीक देऊळकर, प्रथमेश शिंदे यांचे हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून झाले .
१३ फेब्रुवारीस चिंचवड येथील प्रा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ही स्पर्धा संपन्न झाली . एकंदरीत सत्तावीस संघांनी सहभागी झालेल्या या स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण समारंभ रविवारी १३ फेब्रुवारी रोजी रात्री सुप्रसिध्द तरुण अभिनेता सौरभ गोखले यांचे हस्ते पार पडला.
श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालये यांच्या ‘टॅन्जंट ‘ या एकांकिकेने कै. राम गणेश गडकरी करंडक मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर जिराफ थिएटर्स, टिटवाळा यांच्या स्टार या एकांकिकेने दुसरा क्रमांक प्राप्त केला . मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड यांची ‘भाग धन्नो भाग’ ही तिसरी तर बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय यांची ‘मंजम्मापुराणम्’ आणि परीक्षकांच्या शिफारसीनुसार ‘बट बिफोर लिव्ह’ ही नाशिकच्या सौंदर्यनिर्मिती थिएटर यांच्या एकांकिकेला उत्तेजनार्थ एकांकिकांचे पारितोषिक प्राप्त झाले .
या पारितोषिक वितरण समारंभास प्रनुख उपस्थिती, ज्येष्ठ रंगकर्मी, संगीतकार ,गायक ,मधू जोशी होते. परिषदेचे उपाध्यक्ष श्री कृष्णकुमार गोयल यावेळी उपस्थित होते .
श्री पी डी कुलकर्णी, अहमदनगर , संजय हळदीकर, कोल्हापूर आणि सचिन शिंदे, नाशिक यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
सुहास जोशी यांनी प्रास्ताविक, नरेंद्र आमले यांनी परीक्षक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय , गौरी लोंढे यांनी पारितोषिकांचे वाचन केले. किरण येवलेकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले .
यावेळी बोलताना श्री मधू जोशी यांनी त्यांच्या काळातील नाट्य चळवळीची आठवण जागृत केली. जर आपली स्पर्धा आपल्याशीच करीत गेलात, तर तुम्ही सतत प्रथमच येत जाणार आहात, हा विचार कलाकारांनी कायम मनात ठेवावा, असे आवाहन श्री जोशी यांनी केले .
परिक्षकांतर्फे प्रातिनिधिक मत मांडताना श्री सचिन शिंदे म्हणाले की ,कलाकाराने नेहमी ऐकण्याची पण तयारी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे .तीन प्रकारचे सादरीकरण झाले असे त्यांनी सांगितले . एक म्हणजे अत्यंत हौशी कलाकार ,ज्यांनी संहितेचा फारसा अभ्यासही केला नाही . दुसरे म्हणजे स्पर्धेच्या गणितात चपखल एकांकिका बसविणारे संघ आणि तिसरे अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने एकांकिका सादर करणारे संघ . महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूण सर्वच एकांकिकांमधील सर्वच स्त्री कलाकारांचे उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण सादरीकरण, ही या स्पर्धेचे विशेष नोंद घेण्याची बाब ठरली. वास्तव वादाच्या नांवाखाली, बोल्ड विषय मांडताना सुद्धा अनावश्यक अश्लील शब्द असतील, तर असे शब्दप्रयोग टाळणे ,अत्यंत गरजेचे आहे हा सल्लाही त्यांनी दिला . केवळ अभिनय केंद्रबिंदू मानून सादर करण्याऐवजी नाटकाच्या प्रत्येक तांत्रिक घटकांचाही अभ्यास प्रत्येक कलाकाराने, अभिनेत्याने करायला हवा हेही त्यांनी आवर्जून सांगितले . त्याशिवाय नाटकाची परिपूर्ण कलाकृती तयार होऊ शकत नाही .प्रत्येक कलाकाराने आपल्याबरोबर किमान आपले दहा पंधरा सहकारी प्रेक्षक आणणे गरजेचे आहे. कारण प्रेक्षक असतील तरच नाटक खुलते त्यामुळे नाटकाचा प्रेक्षक वाढविणे, ही कलाकाराची ही जबाबदारी आहे ,हे श्री शिंदे यांनी आवर्जून सांगितले . एखाद्या एकांकिकेनंतर सीरियल कडे जाण्याची इच्छा असणे, म्हणजे आपल्यातला कलाकार संपविणे आहे, आपण रंगमंचाला साजेसं नाटक करण्याचा प्रयत्न करतो ,त्याऐवजी आपण नाटकाला साजेसा रंगमंच उभा करण्याचा प्रयत्न करायला हवा , असेही ते म्हणाले. कितीही मोबाइलचा वापर झाला तरी नाटक बघायला प्रेक्षक रंगमंचावर प्रेक्षागृहात येणारच हा विचार कायम मनात असायला हवा .
आपल्या भाषणात उपाध्यक्ष श्री कृष्णकुमार गोयल यांनी येत्या काळात संघांना संख्या मर्यादेमुळे स्पर्धेत सहभागी होता येत नाही, असे घडणार नाही व सगळ्याच संघांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले .नाट्यपरिषदेच्या विविध कार्यक्रमांचे, अर्थात ‘आशा भोसले पुरस्कारांचे महत्त्व’ व सातत्याने भाऊसाहेब भोईर यांचा कृतिशील सहभाग याविषयी ते भरभरून बोलले. लताबाई ना दिलेल्या पहिल्या आशा भोसले पुरस्काराच्या वेळची ,लताबाईंच्या भेटीची आठवणही त्यांनी सांगितली .
आपल्या भाषणात अभिनेता सौरभ गोखले यांनी कोणतेही अभिनयाचे शिक्षण घेतले नसून अनुभवातून शिकत गेल्याचे सांगितले. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे नुसते लिखित संवादांवर लक्ष न देता, समोरचा कलाकार कोणत्या भावनेने बोलतो आहे , त्यावर लक्ष्य दिले ,तर एक्सप्रेशन्स व अभिनय आपोआप होत जातो , यावर भर दिला . केवळ अभिनयावर भर न देता तांत्रिक बाबींचाही अभ्यास करणे गरजेचे आहे . तसेच आपल्या अभिनयातून व्यावसायिकता जगता येते का हे आपल्या जगण्यासाठी महत्त्वाचे आहे ,त्यावरही गंभीरपणे विचार करायला हवा .
मुंबई व्यतिरिक्त इतर सर्व शहरांमधून व्यावसायिक नाटक निर्माण होऊ शकले तर तेथील कलाकार आणि तंत्रज्ञांना ते उपयोगी ठरू शकेल .
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व मराठी कलाकारांनी आपले आरोग्य जपणे, नियमित व्यायाम व खाण्यापिण्यावर लक्ष ठेवणे, हे महत्त्वाचे आहे आणि त्याबाबत दुर्लक्ष करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला .
यानंतर पारितोषिक वितरण समारंभ झाला. या दरम्यानच ‘द थिएटर वर्कशॉप कंपनी ‘ या श्री प्रभाकर पवार यांच्या संस्थेने दोन स्थानिक कलाकारांना वर्षभराची नाट्य शिष्यवृत्ती जाहीर केली. यावर्षीपासून असे दोन कलाकार निवडले जाणार आहेत ,असे प्रभाकर पवार यांनी सांगितले . यावेळचे अभिरंग , पुणे च्या प्रियांका थोरवे व पल्लवी कुलकर्णी यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे (संस्थांप्रमाणे)
१)श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय-
एकांकिका टॅन्जंट –
कै राम गणेश गडकरी करंडक ,प्रथम क्रमांक रुपये १५ हजार रुपये रोख व मानचिन्ह
दिग्दर्शन प्रथम -वैभव उमेश काळे
अभिनय पुरुष प्रथम क्रमांक -आकाश सुतार (भू-आबा)
अभिनय स्त्री उत्तेजनार्थ -मृणाल तारे (भू-वसुधा) नेपथ्य प्रथम – सारंग पाटील
उत्कृष्ट लेखन -तेजस दिलीप परस्पाटकी आणि हेमंत पाटील
२) जिराफ थिएटर्स, टिटवाळा, एकांकिका- स्टार
एकांकिका द्वितीय रु १० हजार रोख व मानचिन्ह
दिग्दर्शन द्वितीय- राकेश जाधव
अभिनय पुरुष द्वितीय – अनिल आव्हाड (भू-स्टार )
पार्श्वसंगीत द्वितीय- रोहन पटेल
परीक्षक शिफारस अभिनय स्त्री –अक्षता टाले (भू-नभा)
३)मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड पुणे एकांकिका &भाग धन्नो भाग
तृतीय क्रमांक ,रूपये ७ हजार रोख व मानचिन्ह
अभिनय स्त्री प्रथम क्रमांक- तनया जाधव (भू- शुभा)
प्रकाशयोजना प्रथम क्रमांक -शुभंकर वाघोले व गौरव जोशी
४) बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे एकांकिका -मंजम्मापुराणम्
उत्तेजनार्थ एकांकिका रुपये ५ हजार रोख व सन्मानचिन्ह
अभिनय पुरुष प्रथम -शंतनू जोशी (भू- मंजम्मा जोगती )
पाश्र्वसंगीत प्रथम -योगेश /साक्षी /प्रद्युम्न
प्रकाशयोजना द्वितीय -मानस दाते /राज दीक्षित
५) सौंदर्यनिर्मिती थिएटर नाशिक – एकांकिका- बट बिफोर लिव्ह
परीक्षक शिफारस उत्तेजनार्थ एकांकिका
परीक्षक शिफारस स्त्री अभिनय -श्रुती कापसे (भू -अन्वयी )
परीक्षक शिफारस पुरुष अभिनय- मंगेश काकड (भू- तो )
६)आम्ही चंद्रपूरकर -एकांकिका -पिंक इन रेन्बो अभिनय पुरुष उत्तेजनार्थ तेजस कुलकर्णी (भू- वेटर आणि एडिटर )
७)वर्ल्ड आर्ट फॅक्टरी, ऐरोली मुंबई – एकांकिका -विटनेस
अभिनय पुरुष उत्तेजनार्थ -अभिषेक किरण (भू- सचिन )
८)भारतीय कला केंद्र हनुमाननगर -एकांकिका- घुशी
अभिनय स्त्री द्वितीय क्रमांक -राधिका साठे (भू- भागी )
९) एस एम प्रॉडक्शन पुणे -एकांकिका -अच्छे दिन व चार दिन
अभिनय स्त्री उत्तेजनार्थ – पल्लवी ठुबे (भू- आशा कॉन्स्टेबल / आक्का)
१०) आकार, पुणे- एकांकिका- नात्यांतर अभिनय स्त्री उत्तेजनार्थ -आयुषी कुलकर्णी (भू- देवा /देवकी )
११)संक्रमण, पुणे -एकांकिका- गुंफण
नेपथ्य द्वितीय – वैभव नवसकर
१२)गडहिंग्लज कला अकादमी, गडहिंग्लज- एकांकिका – निर्णायक क्षणी
अभिनय पुरुष परीक्षक शिफारसींनुसार पुंडलिक परीट (भू-दिग्नाग )
स्पर्धा व कार्यक्रम संयोजन किरण येवलेकर, सुहास जोशी, नरेंद्र आमले, गौरी लोंढे, रुपाली पाथरे , संतोष शिंदे, राजेंद्र बंग, जयराज काळे यांनी केले .