शबनम न्यूज ; पिंपरी चिंचवड (दि.१४ फेब्रुवारी) :- भोसरी येथील डायनोमर्क कंट्रोलच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली, यावेळी राऊत म्हणाले की आज माझा उद्योग वाढीच्या यशात राहुल बजाज साहेबांना मोलाचा वाटा आहे. माझे छोटे वर्कशाप खडकीतील चाळीत असताना त्यांनी भेट देऊन मला दुसर्या जागी स्थलांतरीत होण्याचा सल्ला दिला, त्यानंतर बघा तुमची प्रगती कशी होती असे म्हटले, अगदी तसेच घडले दुसरा प्रसंग असा की बजाज मध्ये दिवाळीत काम करत असताना दिवसभर काम करून घरी जाताना त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावून सांगितले की, तू मोठा उद्योजक होणार असे सांगून माझे मनोधैर्य वाढवले, त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी त्यांचे विचार आचरणात आणत आहे ,त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी यापुढे चालेल असे व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत म्हणाले हे सांगत असताना ते भाऊक झाले.
यावेळी महाराष्ट्र कामगार परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी सांगितले मला कामगार भूषण व साहेबांना पद्मभूषण एकाच दिवशी मिळाला त्यावेळी त्यांनी मला मास्टर या नावाने फोन करून बोलावले व माझा यथोचित सन्मान केला अशा अनेक आठवणींना उजाळा त्यांनी दिला .यावेळी सूर्यकांत मुळे म्हणाले की बजाज समूहांमध्ये राहुल बजाज यांच्या हाताखाली काम करताना अनेक उदाहरणे देऊन ते कामगारांना प्रेरित करत असत असे अनेक उदाहरणे त्यांनी दिली .
यावेळी व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अभ्यंकर,महाराष्ट्र कामगार परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, मनुष्यबळ प्रमुख सूर्यकांत मुळे, गुणवंत कामगार अण्णा जोगदंड ,साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक, विभाग प्रमुख प्रवीण बाराते ,अक्षरा राऊत ,दिलीप इधाते, हेमंत नेमाडे, अमोल पाटे,राजेश वैद्य ,केतकी राऊत, सर्व अधिकारी व कामगार उपस्थित होते.