शबनम न्यूज ; पिंपरी चिंचवड (दि.१४ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक वसंत बोराटे व शिव रस्ता सांस्कृतिक मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली ही रविवार दि. १३ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. तसेच यावेळी चला स्वच्छता गृह होऊया, आपल्या शहराला स्वच्छ व सुंदर बनवूया,.. घरातूनच कचरा वर्गीकरण करा, कचरा वर्गीकरणासाठी चार वेगवेगळ्या डब्यांचा वापर करा. असे घोषवाक्य या “शिवथॉन” रॅलीत देण्यात आले.
या रॅलीत सर्वच वयोगटातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. तसेच यावेळी नगरसेवक वसंत बोराटे यांनी म्हंटले की, हा कार्यक्रम पर्यावरणाचे महत्व सांगण्याचा व कचरा विलगीकरणाचे महत्त्व नागरिकांना समजाविण्याच्या उद्देशाने घेण्यात आला तसेच या कार्यक्रमाच्या अंतर्गत नागरिकांना ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळे करण्याचे आवाहन ही नगरसेवक वसंत बोराटे यांनी यावेळी दिले.