शबनम न्युज | ठाणे
ठाणे | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ठाणे ग्रामीण जिल्हा आढावा बैठक घेऊन आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ठाणे ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना भर देण्यास सांगितले.
स्थानिक पातळीवरील पक्षघडामोडींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच पक्षसंघटना वाढीसंदर्भात आणि आगामी ध्येयधोरणांबाबत अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला आमदार दौलत दरोडा, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, महिला जिल्हाध्य विद्या वेखंडे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, युवती जिल्हाध्यक्ष मोनिका मढवी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, ज्येष्ठ नेते आर. सी. पाटील, यासोबत इतर सेलचे जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.