शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.११ मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पाणी पुरवठा विभाग प्रभाग क्र. 9 खराळवाडी, गांधीनगर, भागासाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन आज दि. 11/03/2022 रोजी करण्यात आले सदर ठिकाणी 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची उंच टाकी व 10 लाख लिटर क्षमतेच्या पंप च्या कामाची उभारणी करण्यात आली.
प्रभागातील नगरसेवक राहुल भोसले, गीता मंचरकर, वैशाली घोडेकर, समीर मासुळकर यांच्या प्रयत्नातून खराळवाडी, गांधीनगर व कामगारनगर परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.सदर उदघाटनाला श्री. रामनाथ टकले, कार्यकारी अभियंता श्री.किरण अंदुले, उपअभियंता, श्री. विपीन थोरमोठे, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
Advertisement