शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माध्यमिक विद्यालय थेरगाव व क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक १९/६/२०२३रोजी शाळेच्या सभागृहात महाराष्ट्राचे ६ वेळा प्रतिनिधित्व करीत ६६ व्या १९ वर्षे शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत दिल्ली येथे कर्णधार पद भूषवीत महाराष्ट्राला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या तसेच चौथ्या ,पाचव्या खेलो इंडिया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी एकूण पाच लाखांचे महाराष्ट्र शासनाचे बक्षीस मिळविणाऱ्या कु. मनीषा राठोड, महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत ४ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागासह पाचव्या खेलो इंडिया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाचे ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळविणाऱ्या कु. भूमिका गोरे, महाराष्ट्राचे ३ वेळा प्रतिनिधित्व करीत एक वेळा महाराष्ट्र संघाचे कर्णधार पद भूषिवीत पाचव्या खेलो इंडिया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाचे ३लाख रुपयांचे बक्षीस मिळविणाऱ्या कु. प्रतीक्षा लांडगे , ६६ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक मिळविणाऱ्या रेखा राठोड, महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत २ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविणारी श्रावणी सावंत, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रूपाली त्र्यंबक डोंगरे, विद्यालयाचे सलग ३ वर्षे शालेय राज्यस्तर स्पर्धेत पदक मिळविणारे राज्यस्तर कबड्डी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे श्री आटवे बन्सी, श्री सोनाली जाधव यांच्यासह मार्च २०२३चे शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाच्या प्रतीक्षा परशुराम कांबळे ९२.४० टक्के ,सिद्धीनारायण पवार ९२.४०% .आदित्य चंद्रकांत कांबळे ९०.२०% गुण मिळवून महानगरपालिकेच्या एक लाख रुपयांचे बक्षिसाचे मानकरी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री श्रीरंग उर्फ आप्पा बारणे खासदार( मावळ) यांचे शुभहस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री महादेव कसगावडे क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांनी भूषविले व सदर कार्यक्रमाला श्री मनोज लोणकर उपायुक्त क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड मनपा ,श्रीमती अनिता केदारी क्रीडा अधिकारी क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड मनपा ,श्री दत्तात्रय झिंजुर्डे सरकार्यवाहक पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन ,श्री अभिषेक बारणे माजी नगरसेवक ,श्री तानाजी बारणे, श्री संतोष बारणे, श्री बाळासाहेब वाघमोडे, श्री बाबासाहेब राठोड मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव,श्री दीपक कन्हेरे क्रीडा पर्यवेक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले ,”मी नगरसेवक असताना महापालिकेच्या माध्यमातून थेरगाव येथे माध्यमिक विद्यालयाच्या प्रशस्त व देखण्या इमारतीची उभारणी केली. त्याच शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करीत आहेत. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. परिस्थितीवर मात करून त्यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे .अशा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च महापालिका प्रशासनाने उचलावा व पुढे त्यांना नोकरीत प्राधान्य द्यावे.”
खासदार बारणे यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेल्या महापालिकेच्या दिलीप वेंगसकर क्रिकेट अकॅडमीची आठवण करून देत ऋतुराज गायकवाड सारखा क्रिकेटर आज देशासाठी खेळतो आहे. २००७साली दूरदृष्टीने उभारलेल्या प्रकल्पाचे फलित असल्याचे खासदार म्हणाले.