शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.२२ मार्च ) :- महाराष्ट्राचे युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली सिंहगडावर स्वच्छता मोहीम आज राबवण्यात आली.
आज सिंहगड किल्ल्यावर जाऊन रयतेचे राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांची ज्योत घेऊन, महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सिंहगडावर सुरू केलेली ही स्वच्छता मोहीम पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरातील जनसामान्यांना लुटणारी भाजप नावाची घाण देखील स्वच्छ करूनच राहणार असा निर्धार देखील आम्ही युवकांनी आज केला!
त्यावेळी सिंहगडावर युवकाध्यक्ष इम्रान भाई शेख, युवती अध्यक्षा वर्षा ताई जगताप व पदाधिकारी अमोल रावळकर, शाहरुख शेख, प्रशांत काळेल,वेदांत माळी , तेजस चिकणे , मुजम्मिल शेख, फहीम शेख,सय्यद नदाफ, मेहबूब आत्तार, निखिल घाडगे, रुबान शेख ,विशाल हमिलफरे , समाधान जाधव , ओम शिरसागर, आयुष निंबाळकर, अभिषेक ओव्हाळ, प्रणव रावळ, सूरज पटेल, दिनेश वाघमारे, रितेश नवले,नेहा पडवळ, प्रतिक अलिबागकर, चैतन्य सपकाळ, अमन शिकलगार, प्रज्वल जगदाळे, विशाल साळवी, वेदांत जगताप, आशिष शितोळे, पवन गायकवाड, पार्थ पडवळ आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे,व युवती कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.