वृत्तसंस्था
शबनम न्यूज : मुंबई (दि.२६ मार्च) :- गेल्या पाच दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल तीन रुपये वीस पैशांनी वाढले आहेत. पेट्रोल, डिझेल महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण आला आहे. महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या सामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सीएनजीवरच्या व्हॅटमध्ये घट करण्याची घोषणा केली होती. त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या अधिसूचनेप्रमाणे इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के करण्यात आला आहे. दिनांक 1 एप्रिलपासून सीएनजीचे सुधारित दर लागू होणार आहेत. सीएनजी स्वस्त होणार असल्याने याचा मोठा फायदा हा ऑटो रिक्षा चालकांसह प्रवासी वाहतूक करणाऱ्या इतर वाहनचालकांना आणि नागरिकांना होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होते. सीएनजीचे दर कमी झाल्याने आता अशा वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाला देखील आळा बसू शकतो.
उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर #सीएनजी वरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी. १ एप्रिलपासून व्हॅट १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के होणार. इंधन स्वस्त झाल्याने टॅक्सी, ऑटो, प्रवासी वाहतूकदारांसह सामान्य नागरिकांना दिलासा. pic.twitter.com/4jHqO5RJ88
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 26, 2022