पुणे, दि. 2 : पुणे विभागातील 17 लाख 79 हजार 200 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 53 हजार 216 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 35 हजार 804 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 38 हजार 212 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.01 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 86 हजार 128 रुग्णांपैकी 10 लाख 58 हजार 282 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 613 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 233 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.44 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 19 हजार 684 रुग्णांपैकी 2 लाख 5 हजार 546 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 826 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 77 हजार 342 रुग्णांपैकी 1 लाख 68 हजार 733 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 44 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 565 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 75 हजार 560 रुग्णांपैकी 1 लाख 63 हजार 931 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 991आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 638 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 94 हजार 502 रुग्णांपैकी 1 लाख 82 हजार 708 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 330 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 464 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 590 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 995 सातारा जिल्ह्यात 675, सोलापूर जिल्ह्यात 690, सांगली जिल्ह्यात 589 तर कोल्हापूर जिल्ह्यात 641 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 264 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 256, सातारा जिल्हयामध्ये 853, सोलापूर जिल्हयामध्ये 260, सांगली जिल्हयामध्ये 885 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 10 रुग्णांचा समावेश आहे.