शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ एप्रिल) :- प्रभाग क्रमांक १४ मधील नाल्या मधील घाण, साठलेला कचरा काढून नाला साफ करणे बाबतची मागणी विठ्ठल प्रतिष्ठान संस्थापक/अध्यक्ष निखिल उमाकांत दळवी यांनी आरोग्य अधिकारी अ क्षेत्रीय कार्यालय निगड़ी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक – १४ सावली हॉटेल मागील व्यापारी संकुल येथील ओढ़या मधे बऱ्याच दिवसा पासुन घाण कचरा मोठ्या प्रमाणात साठला आहे. त्या नाल्यातील कचऱ्यामुळे आजूबाजू च्या परिसरामध्ये दुर्गंधि पसरली आहे. दुर्गंधि मुळे नागरिक हैरान झाले आहेत, आमच्या कड़े स्थानिक नागरिकांच्या तक्रारारी येत आहेत नाल्याच्या घाणीमुळे परिसरात मच्छर, डांस, किडे, उंदीर यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. नाल्याची साफ सफाई होत नसल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. परिसरात रोगराई सुद्धा पसरु शकते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या सर्व बाबी लक्षात घेता सदर नाला लवकरात लवकर साफ करुण स्वच्छ करण्यात यावा यासाठी स्थानिक नागरिकांच्या वतीने तक्रार निवेदन देत आहे. असेही दिलेल्या निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.