शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या अशा प्रबोधनकार ठाकरे वाचनालय व शिवसेना शाखा, मोहननगर नूतनीकरण करण्यात आले. या नवीन वाचनालयाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक ०२ शनिवार रोजी सायंकाळी ७ वाजता शिवसेना उपनेते, सातारा संपर्कप्रमुख मा नितीन बानगुडे पाटील, पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख वैभव थोरात यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाची सुरवात प्रभागांतील अंध व्यक्तींच्या संगीताने सुरू करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये फीत कापून उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला. प्रभागाच्या माजी नगरसेविका सौ मीनल यादव यांनी प्रथम सर्व पाहुण्यांचे स्वागत केले . नितिन बानगुडे पाटील, वैभव थोरातसाहेब ,सौ सुलभाताई उबाळे ,शहरप्रमुख सचिनजी भोसले ,राजेश वाबळे, युवराज कोकाटे , भाविक देशमुख ,सौ वैशालीताई असे अनेक मान्यवरांना फोटो फ्रेम ,शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान व स्वागत करण्यात आले.
स्वागतामध्ये माजी नगरसेविका सौ मीनल यादव यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या विविध विकासकामांचा, करोणाच्या काळामध्ये पुरविलेल्या सेवांचा, मदतीच्या कामांचा उजाळा दिला. त्यानंतर शिवसेनेच्या सौ सुलभा उबाळे, शहराध्यक्ष सचिन भोसले,संपर्कप्रमुख वैभव थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच माजी नगरसेविका मीनल यादव व शिवसेना संघटक विशाल यादव यांच्या कामाचे विविध विकासकामांचे कौतुक केले . त्यानंतर शिवव्याख्याते मा श्री नितीन बानगुडे पाटील यांनी ” शिवसेना काल आज आणि उद्या ” या विषयावर साधारणत एक ते दीड तास आपले मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रमाच्या वेळी मोहननगर येथील गाय वासरू चौकापर्यंत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अक्षय मोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विशाल यादव यांनी मानले .कार्यक्रमाच्या शेवट राष्ट्रगीताने झाला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन मोहननगर शिवसेना शाखा, विशाल यादव युवा मंच,अष्टविनायक मित्र मंडळ, युवा सहकारी, ज्येष्ठ शिवसैनिक यांनी केले.