शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड शहरातील विविध मागण्यांसंदर्भात राजेंद्र तरस सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र तरस यांच्यावतीने पिंपरी चिंचवड मनपा, सह शहर अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनातील मागणी पुढील प्रमाणे –
बापदेव नगर ते मुकाई देवी मंदिर पर्यंत नालाची सीमा भिंत बांधणे :
बापदेव नगर पासून लोटस लक्ष्मी पर्यंत नालाची सीमा भिंत एक साईड उंची वाढलेली आहे तरी दुसरीकडे ची उंची वाढवावी, कारण मागील पावसात ही सीमा भिंतीची उंची वाढवली नसल्याने त्यांना नाला बाजूकडील घरांमध्ये पाणी जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तरी नाल्याचे दोन्ही साईड ने त्वरित काम चालू करावे, असे राजेंद्र तरस यांनी म्हंटले आहे.
मुकाई चौक या ठिकाणी किंवा अन्य दुसरीकडे हॉकर्स झोन निश्चित करा :
मुकाई चौक या ठिकाणी अनेक गोरगरीब नागरिक की ज्यांचे हातावर पोट आहे असे नागरिक त्या ठिकाणी हात गाडी लावून आपली उपजीविका जगत आहे. तरी या ठिकाणी अनेक वेळा अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येते. त्या कारवाई मध्ये या गोरगरीब नागरिकांचे नुकसान होते, त्यांच्या वस्तू जप्त केल्या जातात, त्या पुढे त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते, तरी मुकाई चौक या ठिकाणी तात्पुरता हॉकर्स झोन निश्चित करून सर्वांना अधिकृत परवाना द्यावा.
किवळे भागातील उत्तम नगर या ठिकाणी कायमस्वरूपी ड्रेनेज लाईन ची अडचण सोडवावी :
उत्तम नगर या ठिकाणी ड्रेनेज लाईन नसल्याने अनेक अडचणींचा सामना त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना करावा लागतो. त्या ठिकाणी अनेक बिल्डर ची साईट चालू असल्याने त्यांना भविष्यकाळात या साइटची ड्रेनेज लाईन टाकणे बंधनकारक आहेत. त्यांच्या माध्यमातून या भागातील ड्रेनेजची लाईन त्या बिल्डरच्या लाईन ला जर सोडली तर या भागातील मैला ला लाईन द्वारे आउटलेट जाण्यास मार्ग मिळेल, असे राजेंद्र तरस यांनी म्हटले आहे.
विकास नगर येथील झोपडपट्टी भागात आकर्षक पेंटिंग करावी :
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी झोपडपट्टी भागात रस्त्यालगतच झोपडपट्टी आहे. त्या ठिकाणी आकर्षक अशी पेंटिंग केलेले पहावयास मिळाली त्याबद्दल ची पेंटिंग विकास नगर येथील एम. बी. कॅम्प या ठिकाणी रोड लगत असलेली घरे पेंटिंग करावी.
साईनगर येथील ड्रेनेजची समस्या सोडवावी :
साईनगर ठिकाणी श्रीराम कॉलनीतील ड्रेनेजची समस्या सोडवावी.
क्रीडा विभागामार्फत ओपन जिम बसविण्यात यावी :
विकास नगर, किवळे, मामुर्डी, साई नगर भागात क्रीडा विभागामार्फत ओपन जिम बसविण्यात यावी, असेही सदर निवेदनात राजेंद्र तरस यांनी नमूद केले आहे.