शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१८ एप्रिल) :- भोसरी गावात सालाबादप्रमाणे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव आज सोमवारी आणि मंगळवारी (दि. १८ आणि १९ एप्रिल) होणार आहे. आज सोमवारी होणाऱ्या बैलगाडा शर्यत काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली होती . परंतु आज सकाळी ६ वाजता श्रीं ची पूजा, सायंकाळी ७.३० वाजता लोकनाट्य तमाशा, सायंकाळी ७.३० ते रात्री १० पर्यंत श्रीं च्या पालखीची मिरवणूक आणि ढोल ताशांचे खेळ आणि मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी १२ लोकनाट्य तमाशाची हजेरी, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत श्री भैरवनाथ मंदिर मध्ये चक्री भजनाचा कार्यक्रम आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कुस्त्यांचा जंगी आखाडा हे नियोजित कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती भोसरीतील श्री भैरवनाथ मंदिर उत्सव समितीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.