शबनम न्यूज : पुणे (दि.१८ एप्रिल) :- पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शनिवारी महापालिका निवडणुकीसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी विधानसभानिहाय बैठका घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खा. सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला जयंत पाटील यांनी पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी सभा आयोजित केल्या होत्या. त्यांनी प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या वेळी आमंत्रित केले आणि त्यांना बूथ समित्या मजबूत करण्यास आणि मतदार यादीचा तपशीलवार अभ्यास करण्यास सांगितले होते. पवार आणि पाटील म्हणाले की, आम्ही आमच्या बूथ समित्या मजबूत केल्या तर पुणे शहराचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असेल.
नागरिक केंद्रित योजना राबवण्यावर भर
राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले कि, सर्व सभा बंद दाराआड होत्या, माध्यमांना परवानगी नव्हती. आम्ही क्षेत्रनिहाय समस्या कमकुवतपणा आणि आमचे मजबूत मुद्दे यावर चर्चा केली. कार्यकर्त्यांना थेट नेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली ज्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
पवार म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकार विविध निर्णय घेत असून नागरिक केंद्रित योजना राबवत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता सरकारचे ब्रँड ॲम्बेसिडर बनणे आणि मतदारांना माहिती देणे आवश्यक आहे.