शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
चऱ्होली – पिंपरी-चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरातील युवा नेते सुनील (अण्णा) काटे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे व माजी महापौर , नगरसेवक नितीन आप्पा काळजे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले तसेच आरोग्य शिबिरात अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबीर चे उदघाटन भोसरी विधान सभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले
सुनील अण्णा काटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सिंहगड रोड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत प्रसूती सिजर, मोफत मुतखडा ऑपरेशन, मोफत हाडांची ऑपरेशन, मोफत डायलिसिस ,मोतीबिंदूचे ऑपरेशन (सवलतीच्या दरात) तसेच मोफत हृदयाचे ऑपरेशन इत्यादी सुविधा या शिबिरा द्वारे नागरिकांना देण्यात आल्या.
या शिबिरामध्ये आरोग्याची तपासणी करून ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज आहे अशा रुग्णांना या सुविधा देण्यात आले आहेत सदर शिबिर पुणे -आळंदी रोड, जगताप मंगल कार्यालय , काटे कॉलनी येथे एक नोव्हेंबर रोजी संपन्न झाले,
यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना सुनील (अण्णा) काटे यांनी सांगितले की सद्य परिस्थितीमध्ये नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात मिळाव्यात तसेच कोरोना काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत होता याकरिता मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेणे आवश्यक होते या दृष्टीनेही आपण हे रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर आयोजित केले असेच समाजोपयोगी उपक्रम पुढील काळातही राबविले जाणार असल्याचे काटे यांनी सांगितले
या शिबिरामध्ये प्रत्येक सहभागी रक्तदात्यास 5 लाखाचा विमा मोफत देण्यात आला तसेच या शिबिरामध्ये सहभागी रुग्णांना, नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सुनील अण्णा काटे यांनी सांगितले
या शिबिराचे उद्घाटन भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी महापौर विद्यमान नगर सेवक नितीन अप्पा काळजे तसेच अनेक राजकीय नेते मंडळी, सुनील अण्णा काटे यांचे कार्यकर्ते, मित्रमंडळी ,परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, युवा नेते सुनील (अण्णा ) काटे यांच्या वतीने होत असलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचे आमदार महेश लांडगे यांनी कौतुक केले यावेळी उपस्थित सर्वांनी सुनील अण्णा काटे यांना वाढदिवसाच्या तसेच भविष्य काळातील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.