शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ एप्रिल) :- निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थातच एन.डी.ए.च्या आगामी प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अभ्यासवर्ग घेतले जाणार आहेत. एन.डी.ए., सैन्यदलातील करिअरच्या संधी, प्रवेशप्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी रविवार, दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी साडेआठ वाजता विद्यार्थी अन् पालकांच्या मेळाव्यात ब्रिगेडिअर बलजितसिंह गिल (नि.)आणि ब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि.) हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिवर्षी घेण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून आतापर्यंत सहा विद्यार्थी एन.डी.ए.मध्ये दाखल झाले आहेत. या वर्गासाठी फक्त चाळीस विद्यार्थ्यांना मर्यादित प्रवेश देण्यात येणार आहे. बाहेरगावच्या तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था मंडळाकडून केली जाईल. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक असून नोंदणी व अधिक माहितीसाठी ८४४६४२२९६५, ८६९८६९५२४६ किंवा ८५५४०२३००७ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने भास्कर रिकामे आणि रमेश बनगोंडे यांनी केले आहे.