शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
दिनांक २३/०४/२०२२ ते २८/०४/२०२२ दरम्यान नेहरू स्टेडियम पुणे येथे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ४८ वी पुणे जिल्हा कुमार,कुमारी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत पुरुषांच्या एकूण १०३ तर मुलींच्या ३४ संघानी सहभाग नोंदविला होता.सदर सामने साखळी, बाद पद्धतीने खेळविण्यात आले. सदर स्पर्धेत पुरुषांच्या विभागात अभिजीत दादा कदम प्रतिष्ठान आणि मुलींच्या विभागात पिंपरी-चिंचवड मनपाच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाने विजय संपादन केला.
क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाच्या खेळाडूंनी अंतिम लढतीत मनीषा राठोड, भूमिका गोरे, पूजा तेलंग यांच्या उत्कृष्ट चढाया व सिफा वस्ताद, सविता गवई ,रूपाली डोंगरे यांच्या उत्कृष्ट पकडीमुळे तसेच कोमल राठोड ,तेजल महाजन, प्रतिक्षा लांडगे, निकिता माळी, विद्या गायकवाड, रेखा राठोड यांच्या सांघिक प्रयत्नाने द्रोणा कबड्डी संघ पुण्याचा ४७-४३ असा ०४ गुणांच्या फरकाने विजय खेचून आनत पराभव केला. पराजीत संघाकडून श्रुतिका व्यवहारे, आचल पवार, साक्षी गदादे यांनी पराजय टाळण्याचा प्रयत्न केला.
अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत अभिजीत दादा कदम प्रतिष्ठान व चेतक स्पोर्ट्स बालेवाडी २३-२३ गुणझाले असताना अभिजीत दादा संघाने ५-५ चढायात ७-५ अशी २ गुणांने आघाडी घेत विजयी संपादन केला. विजयसंघाकडून संघाकडून सनत मांडगे ,दीपक शर्मा यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजय मिळविला. पराभूत संघाकडून राहुल वाघमारे, ओमकार काळभोर यांनी पराभव टाळण्याचा चुरशीचा प्रयत्न केला.
सदर स्पर्धेस माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, शिवसेनेचे पुणे शहर संघटक गजानन पंडित यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आयोजक उमेश गालिंदे, नगरसेवक चंदू कदम, शिवसेनेचे वैभव वाघ, नगरसेवक विशाल धनवडे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव व श्रीमती शकुंतला खटावकर , श्रीमती वासंती ताई बोर्डे , श्री. राजेंद्र आण्णा देशमुख आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंजुर्डे ,श्री. संदीपजी पायगुडे,श्री. योगेश यादव , राजेंद्र आंदेकर यांच्यासह पुणे जिल्हा संघाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा निवड समितीत धनश्री जोशी, सुजाता समगिर, ऋषिकेश मद्रासी हे होते .
पिंपरी चिंचवड मनपाचा क्रीडा कला विकास प्रकल्प संघ विजय विजय झाल्याने सदर संघाचे श्रीमती सुषमा शिंदे सहाय्यक आयुक्त क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड मनपा, रवींद्रकुमार घोडके सहाय्यक आयुक्त प्रभाग श्रीमती अनिता केदारी क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका , देवांना गटवार कार्यकारी अभियंता ग प्रभाग, चंद्रशेखर कदम माध्यमिक विद्यालय थेरगाव मुख्याध्यापक, रामेश्वर पवार पर्यवेक्षक ,परशुराम वाघमोडे, प्रशासनाधिकारी क्रीडा लक्ष्मण पवार कार्यालयीन अधीक्षक क्रीडा , चंदन गंगावणे उपलेखापाल ,विश्वास गेंगजे, राजेंद्र नागपुरे या सर्वांनी सदर संघाला प्रोत्साहन देऊन विजय झाल्याबद्दल अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर संघास श्रीमती सुषमा शिंदे सहाय्यक आयुक्त क्रीडा श्रीमती अनिता केदारी क्रीडा अधिकारी गोपीचंद करंडेश्री.कालिदास लांडगे यांचे सहकार्य लाभले. सदर संघास बन्सी आटवे यांनी मार्गदर्शन केले तर श्रीमती सोनाली जाधव यांनी व्यवस्थापिका म्हणून काम केले.