शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
दि.01 मे 2022 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग प्रभाग थेरगाव येथील नवीन इमारतीमध्ये स्थलांतर झाले आहे .याचेच औचित्य साधून महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ग प्रभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित ग प्रभागाच्या नवीन इमारतीमध्ये ध्वजारोहण संपन्न झाले . त्यानंतर अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सांस्कृतिक कार्यक्रम, नवी दिशा फाउंडेशनचा सत्कार ,उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार ,रक्तदान शिबिराचे आयोजन , सांस्कृतिक कार्यक्रमात बाल शाहीर यांचे पोवाडे गायन – प्राथमिक शाळा थेरगाव पीसीएमसी तसेच मा. आयुक्त , अतिरिक्त आयुक्त यांची ग प्रभागास सदिच्छा भेट असे विविध कार्यक्रम पार पाडले.
ग प्रभाग अधिकारी मा.श्री. रवींद्रकुमार घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान संकलन व्यवस्थित संपन्न झाले. त्यावेळी रक्तदान शिबिरात जवळपास 50 ते 55 पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी व कर्मचारी वर्गांनी रक्तदान केले. मा.श्री. जितेंद्र वाघ अतिरिक्त आयुक्त -2, मा.श्री. रवींद्रकुमार घोडके ग प्रभाग अधिकारी, मा. श्री. देवंना गट्टूवार कार्यकारी अभियंता स्थापत्य -ग प्रभाग, रामेश्वर पवार -माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष, रवि राठोड – लिपिक, श्री. विठ्ठल , मा.श्री.राजेंद्र आहेर सर तसेच अनेक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून “रक्तदान हेच श्रेष्ठदान” व “रक्तदान हेच जीवनदान असल्याची ” यांची जाणीव करून दिली.
मा.श्री. राजेश पाटील- आयुक्त , मा.श्री. विकास ढाकणे-अतिरिक्त आयुक्त, जितेंद्र वाघ -अतिरिक्त आयुक्त -2, अण्णा बोदडे -सहाय्यक आयुक्त , मा.श्री. कैलास बारणे अपक्ष गटनेते,मा. श्री.रवींद्र कुमार घोडके व मा.श्री.देवांना गट्टूवार, मा.श्री. चंद्रशेखर कदम- मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव , मा.श्री. बबनराव झिंजुर्डे -पिंपरी-चिंचवड मनपा कर्मचारी महासंघ अध्यक्ष, व कर्मचारी महासंघाचे इतर सर्व पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ग प्रभाग थेरगाव नवीन इमारतीची पाहणी करण्यात आली ,पाहणी करून झाल्यास ग प्रभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मा.आयुक्त ,अतिरिक्त, व कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तसेच रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना रक्तदानाचे प्रमाणपत्र देऊन मा. श्री.राजेश पाटील आयुक्त, मा.श्री.विकास ढाकणे, जितेंद्र वाघ अतिरिक्त आयुक्त 1व 2, प्रभाग अधिकारी ,स्थापत्य अभियंता व आणि कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत सन्मान करून रक्तदात्यांचे मा.आयुक्त साहेबानी अभिनंदन करून अशा अनेक सामाजिक कार्यामध्ये सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्यास सुचित केले