शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील सेक्टर क्र. २१ त्रिवेणी नगर, कृष्णा नगर या परिसरामध्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने व मनपाने घरे बांधण्याच्या प्लॅनला मंजुरी देऊन घरे बांधण्यास परवानग्या दिल्या होत्या. परंतु सध्या मनपा व न्यायालय यांच्यातील न्यायालयीन प्रक्रियेमुळे या ठिकाणी नव्याने रेड झोन ची आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे रेड झोन मध्ये एस.आर.ए. च्या कामास परवानगी कशी दिली? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, सेक्टर क्र. २१ त्रिवेणी नगर, कृष्णा नगर या परिसरामध्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने व मनपाने घरे बांधण्याच्या प्लॅनला मंजुरी देऊन घरे बांधण्यास परवानग्या दिल्या होत्या. परंतु सध्या मनपा व न्यायालय यांच्यातील न्यायालयीन प्रक्रियेमुळे या ठिकाणी नव्याने रेड झोन ची आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना नव्याने घर बांधण्यास व घर दुरुस्ती करण्यास परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच या परिसरात पुनर्वसनाची स्कीम पूर्ण झालेली असूनही पात्र लाभार्थी यामध्ये राहायला जाऊ शकत नाही, असे असताना याच परिसरात त्रिवेणीनगर चौकात एस आर एच या भव्यदिव्य प्रोजेक्टचे रात्रंदिवस काम चालू असून ते काम पूर्णत्वास येत आहे. सामान्य नागरिकांना नवीन घर बांधण्यास व घर दुरुस्तीस परवानगी दिली जात नाही. तर एस आर एच या भव्य प्रोजेक्टची काम काय चालू आहे मनपाकडून हा दुजाभाव चालू आहे आणि नवीन रेड झोन हद्द निश्चित करण्याकरिता कलेक्टर ऑफिसला प्रकरण पाठविले आहे. परंतु हे प्रकरण प्रलंबित आहे. तरी नवीन रेड झोन हद्द निश्चित बाबत लवकरात लवकर निर्णय होण्याकरिता आदेश द्यावेत व रेड झोन मध्ये एस.आर.ए या कामास परवानगी कशी दिली? याची चौकशी व्हावी, असेही सदर निवेदनात सुलभा उबाळे यांनी नमूद केले आहे. यावेळी माजी मंत्री व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर उपस्थित होते.