शबनम न्युज | पिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व पर्यावरण सेल यांच्या वतीने शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण जनजागृती दापोडी ते निगडी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
दापोडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास विनम्र अभिवादन करून सायकल रॅली सुरू करण्यात आली. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व पर्यावरण समितीचे अध्यक्ष विनय शिंदे व माजी नगरसेविका स्वाती (माई) काटे, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्षा रमाताई सनी ओव्हाळ व माजी नगरसेवक सनी दादा ओव्हाळ,सेवादल शहर अध्यक्ष महेश झपके,युवती अध्यक्षा वर्षाताई जगताप,व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकबर मुल्ला ,अर्बन सेल अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप,चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगिताताई कोकणे,उपाध्यक्ष संदिप पाटील, बाळासाहेब पिल्लेवार,पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष सुलेमान शेख,पर्यावरण कार्याध्यक्ष सतिश मटपरती,पर्यावरण उपाध्यक्षा सौ.ज्योती जाधव,पिंपरी विधानसभा अध्यक्षा नुतन जाधव,पर्यावरण दापोडी सरचिटणिस पंकज ओव्हाळ,राकेश काटे,मा.सामाजिक न्याय पिंपरी विधानसभा अध्यक्ष लुकस मुगुटमल,सुशिल सांगळे ,अजय भोसले,शिलवंत सुर्यवंशी,उपाध्यक्षा अर्चना राऊत,हारपुडे साहेब तसेच अनेक सायकल प्रेमी मित्रांनी उत्फुर्तपणे यात सहभागी होत पर्यावरण सायकल रॅलीत सहभागी झाले. आकुर्डी येथे इकलियास सय्यद यांचा वतीने सहभागी सायकलपटुना पाणी व चहाची व्यवस्था करण्यात आली.
उपाध्यक्ष शकुल्ला पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण जनजागृती सायकल रँलीत सहभागी सभासदांना पुष्ष देवुन गौरव करित कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.