शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब मगर बँकेचे विद्यमान चेअरमन व वैदिक विस्डम एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक राजेश सस्ते यांनी आज गणेशोत्सवानिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्वर करिष्मा सोसायटी , केसर ट्री टाउन सोसायटी,
इंद्रायणी पार्क मित्र मंडळ ,,इला सोसायटी,छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान लक्षमी नगर, जय गणेश मित्र मंडळ इत्यादी गणेश मंडळांना भेटी दिल्या तसेच गणरायाची आरती केली व युवक वर्गाने प्रगतीपथावर कसे जावे पद्धतीपथावर जाण्यासाठी कोणते गुण आत्मसात करावे नोकरीचे मागे न लागता व्यवसाय क्षेत्रात प्रयत्न करावेत तसेच आपला परिसर आपले शहर आपला देश हा स्वच्छ सुंदर व सक्षम होईल या दृष्टिकोनातून युवकांनी आपली आयुष्याची वाटचाल सुरू ठेवावी असे प्रतिपादन करीत जनजागृती केली. एक प्रकारे राजेश सस्ते यांनी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.
प्राध्यापक राजेश सस्ते हे मागील 15 ते 20 वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत या सामाजिक जीवनात राजेश सस्ते यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले या सामाजिक उपक्रम राबविताना त्यांनी अनेक गरजू नागरिकांना उपयोगात येतील असे समाज उपयोगी उपक्रम राबविले यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तसेच स्वच्छता अभियान अन्नदान असे अनेक उपक्रम राबवीत परिसरातील नागरिकांना आपण करीत असलेल्या सामाजिक उपक्रमातून अनेक लाभ मिळवून दिला आहे.
या गणेशोत्सव निमित्त राजेश सस्ते हे पहिल्या दिवसापासूनच अनेक गणेश मंडळांना भेटी देत आहेत तसेच गणरायाची आरती करून जनजागृतीचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे व हे जनजागृतीचे अभियान आपण भविष्यकाळातही असेच राबविणार असल्याचे राजे सस्ते यांनी सांगितले.