शबनम न्युज | पुणे
पुणे शहरात सात नवीन पोलीस ठाणे सुरु होणार आहे. पोलिस आयुक्त कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीत वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सात नवीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीची दखल घेत पालकमंत्री यांनी शहरात सात नवीन पोलिस ठाणे सुरु होणार असल्याचे सांगितले.
वाघोली, फुरसुंगी, आंबेगाव, काळे पडळ, नांदेड शहर, खराडी आणि बाणेर ही सात पोलिस ठाणे सुरू केली जाणार आहेत. ते म्हणाले, “पुणे शहर पोलिसांनी शहरात सात नवीन पोलिस ठाणी मंजूर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. पोलिसांच्या प्रभावी कामकाजासाठी आवश्यक असलेली ही पोलिस ठाणी लवकरच मंजूर केली जातील, असे आश्वासन मी दिले आहे. वाघोली, फुरसुंगी, आंबेगाव, काळे पडळ, नांदेड शहर, खराडी आणि बाणेर ही सात पोलिस ठाणी सुरू केली जातील,” अशी माहिती पालकमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिली.