शबनम न्युज | देहूगाव
स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना फेब्रुवारी २०११ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान माळीनगर देहूगाव येथे घडली.
याप्रकरणी रघुनाथ भिकोबा कुंभार (वय ६५, रा. अभंग नगरी सोसायटी) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार अनिल जनार्दन सरोदे, भारत नरहरी पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले त्यानंतर फ्लॅट न देता फसवणूक केली. दरम्यान, फिर्यादी यांनी फ्लॅट आणि पैशाबाबत विचारणा केली असता, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली.
Advertisement