शबनम न्युज | पिंपरी
दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास देहूगाव येथील कमानी जवळ घडली. गौतम जगन पवार (वय २३, रा.तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अनिकेत विजय डोळस (वय २८, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) यांनी शुक्रवारी (दि. २१) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौतम पवार दुचाकीवरून भरधाव वेगात जात होता. दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावरील देहू येथील कमानी जवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने गौतम यांचा मृत्यू झाला.
Advertisement