शबनम न्युज | चऱ्होली
चऱ्होली येथे श्रावणी इव्हेंट यांच्या वतीने नागरिकांसाठी मनोरंजननगरी उभारण्यात आली आहे. हॅण्डलूम, हॅण्डीक्राफ्ट व मनोरंजन असा तिहेरी संगम, त्यामध्ये समावेश केला गेला आहे. म्हणून येथील विविध २४ खेळांच्या राइड्सचा आनंद घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत, अशी माहिती व्यवस्थापक कानिफनाथ भुजबळ यांनी दिली.
तसेच ही मनोरंजननगरी दि ३०/१०/२०२२ सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत खुली राहणार आहे. खेळांच्या विविध राइड्स व विविधि वैशिष्ट्यपूर्ण वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्याने चऱ्होली आळंदी मोशी दिघी व आसपासचे नागरिक या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही कानिफनाथ भुजबळ यांनी व्यक्त
केला.
महिलांना येथे खरेदीसाठी विशेष वाव आहे. इमिटेशन ज्वेलरी व जंक, लाक, लाख बांगडी,ओरिसा, कोलकाता,आसाम,भागलपूर,बनारस येथील विविधयेथे उपलब्ध आहेत. विविध वस्तू राइड्समध्ये लहान मुलांसाठीमूनवॉकर, कपबशी, झुला, कार,जीप, प्लेन, हेलिकॉप्टर, वॉटर पार्क,सी-सॉ, मोठ्यांसाठी कोलंबस, मेरी गो राऊंड, ड्रॅगन ट्रेन, ब्रेक डान्स, सोलंबो सर्वांचे आकर्षण असलेले उंचच उंच पाळणे, क्रॉस व्हील, तसेच विविध खाद्यपदार्थ येथे आहेत. मनोरंजननगरीस भेट देऊन भोसरी पिंपरी चिंचवड करांनी अनेकविध राईडस्चा
आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्य वतीने करण्यात आले आहे . तसेच सदर मनोरंजननगरी तनिश सोसायटी जवळील मैदान चऱ्होली बु.येथे आयोजन करण्यात आली आहे.