-
- पालिका चौका चौकात बसविणार कापडी पिशव्यांचे ” क्लोथ बॅग वेडींग मशीन ”..
- भाजपच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या पाठपुराव्याला यश
शबनम न्युज | पिंपरी
प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड शहर बनविण्याच्या उद्देशाने शहरातील प्लास्टिक पिशव्या मुक्त करून कापडी पिशव्यांचा जास्तीत-जास्त वापर होण्याकरिता महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पाउलं उचलण्यास सुरुवात केली आहे. प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने कापडी पिशव्यांना प्रोत्साहन देण्याचे नियोजन केले आहे. भाजपच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी याबाबत आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता.
त्या अंतर्गत शहरातील बाजारपेठेची ठिकाणे, भाजी मंडई, यासह गर्दीच्या ठिकाणी १०० ” क्लोथ बॅग वेडींग मशीन ” बसविण्यात येणार आहेत. यासाठी जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रायोगिक तत्वावर महापालिकेत “क्लोथ “बॅग वेडींग मशीन बसविण्यात आली आहे.
याबाबत माजी उपमहापौर सौ. शैलजाताई मोरे म्हणाल्या, ” प्लॅस्टिक बंदीसाठी महापालिकेसह शहरातील पर्यावरणासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था जनजागृती करत आहेत. मात्र, प्लॅस्टिक बंदीची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नव्हती. पिंपरी चिंचवड महापालिका वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कापडी पिशव्यांचे मशीन चौका-चौकात बसविण्यात आले होते. त्यामुळे प्लास्टिक मुक्त शहर अशी त्यांची खरी ओळख निर्माण झाली आहे. प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने कापडी पिशव्यांना प्रोत्साहन देण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. त्याला यश आले आहे. शहरातील १०० महत्वाच्या ठिकाणी “क्लोथ बॅग वेडींग” मशीन बसविण्यात येणार आहेत. तसेच कापडी पिशव्या बनविण्याचे काम बचत गटांना देण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगार देखील निर्माण होणार आहे. त्याबद्दल आयुक्तांचे मनापासून आभार मानते ”.