शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे. या ठिकाणी दिनांक०१/१२/२०२२ वार गुरुवार रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आळंदी ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने आणि झाली आणि प्रास्ताविक संजीव कांबळे कार्यक्रम अधिकारी- राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले.
या प्रसंगी प्रमुख वक्त्या डॉ. उर्मिला शिंदे आरोग्य कार्यशाळा प्रमुख व वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आळंदी यांनी एडस जनजागृती व आरोग्य विषयक विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले, एडस हा आजार कोणत्या कारणांनी होतो या संदर्भात आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे तसेच यांची लक्षणे कोणती आहेत त्याबाबत आपण आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे या संदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन केले.डॉ. विद्या कांबळे, दंतवैद्यचिकित्सक वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय आळंदी यांनी दातांची काळजी कशी घ्यावी दात घासण्याची योग्य पद्धत कोणती तसेच दातावरून तसेच हिरड्यावरून एड्स ची लक्षणे कोणती असतात यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी आपल्या मनोगतामध्ये एड्स आणि मानवी आरोग्य याविषयी महत्वाचे मार्गदर्शन केले. मोक्षगुण्डम विश्वेसरय्या यांचे आरोग्याविषयीचे महत्वाचे उदारण देऊन आपण आरोग्याची कशी काळजी कशी घेतली पाहिजे यासंदर्भात विविध उदाहरणासह बहुमोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार – गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला मा. डॉ. श्रीनिवास कोलोड दंत वैद्यचिकित्सक, ग्रामीण रुग्णालय आळंदी, मा. श्री. एच. बी. कुलकर्णी आरोग्य निरीक्षक, ग्रामीण रुग्णालय आळंदी, मा. सौं. दिपाली लोंढे मॅडम आधीपरिचारिका ग्रामीण रुग्णालय आळंदी,प्रा. माणिक कसाब, प्रा. शाहूराज येवते, प्रा. शैला वाळुंज,प्रा. डॉ. छाया जोशी, प्रा. विश्वनाथ व्यवहारे, प्रा. डॉ. राजू शिरसकर प्रा.प्रेरणा पाटील,प्रा.सोनाली अभंग,प्रा. सविता मानके,प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. दिपाली ताम्हाणे,प्रा. सोनाली तापकीर, प्रा.प्रियंका जाधव, मा. श्री. प्रवीण भावे कार्यालयीन अध्यक्ष, सौ. वर्षा ताजणे, श्री सुशेन राठोड,श्री. वैभव बडवे श्री श्रीकांत कांबळे इत्यादी सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विविध शाखेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भताशे तर उपस्थितांचे आभार डॉ. रणजित कदम यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.