शबनम न्युज | पिंपरी
डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे) मा. महापौर, मा. नगरसेविका) यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 25 डिसेंबरला विविध कार्यक्रम घेण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजिलेल्या कार्यक्रमात विरंगुळा केंद्र येथे वयाची 75 वर्षे आयुष्य निरोगीरित्या पूर्ण केलेल्या सुमारे 20 ज्येष्ठांचा सत्कार मा. महापौर हनुमंतराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राहुलभाऊ भोसले उपस्थित होते.
यावेळी डॉ. श्रीपाद परसपाटकी आणि पी. डी. पाटील यांना जीवन गौरव सन्मान देण्यात आला. नेहरूनगर दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया शिंदे आणि जमीर सय्यद यांचा कार्य गौरव सन्मान करण्यात आला. संघाचे अध्यक्ष टेकुर, तसेच हेळकर, कानिटकर, आढाव यांनी परिश्रम घेतले. यावेळी स्वशक्ति महीला बचत गट महासंघाच्या सभासदांसाठी स्ट्रेस रिलीज फाऊंडेशनचे श्री. अशोक देशमुख यांचे महीला आरोग्य व तणाव मुक्ती यासंदर्भात व्याख्यान झाले. यावेळी सर्वांसाठी मोफत हिमोग्लोबिन, रक्तदाब इ. तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. असंख्य महीला आणि ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी तपासणी करुन घेतली.
तसेच डॉ. वैशाली घोडेकर लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुमारे दीडशे स्पर्धकांनी या वेळी स्पर्धेत गाणी गायली. विजेत्या स्पर्धकांना व उत्तेजित स्पर्धेकांना बक्षिसे देण्यात आली.