शबनम न्युज | भोसरी
विवाहतीला मारहाण तसेच माहेराहून हुंडा आणण्यासाठी धमकी, शिवीगाळ, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 मे 2022 पासून 29 सप्टेंबर 2022 दरम्यान, वाकवस्ती, हडपसर, पुणे व मॅक्झिम चौक दिघे येथे घडली.
याप्रकरणी विवाहतीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सासरच्या लोकांविरोधात 27 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय विश्वनाथ जामले (वय 27), विश्वनाथ पर्वती जामले (वय 55) तसेच महिला आरोपी (वय 48) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना वेळोवेळी माहेराहून हुंडा आणला नाही, त्यामुळे शिवीगाळ करून व मारहाण करून फिर्यादी यांचा शारीरिक व मासिक छळ केला. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली, असे विवाहातीने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केंद्र करीत आहेत.