शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्ध उद्योजक राजकुमार परदेशी यांची पिंपरी-चिंचवड शहरातील वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी दिले.
निवडीनंतर राजकुमार परदेशी यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे शहरात विस्तार मोठ्याप्रमाणात करणार असल्याची प्रतिक्रिया दिल्या. तसेच आगामी महानगरपालिकेची येणारी निवडणूक वंचित बहुजन आघाडी सर्व शक्तीनिशी लढविणार असल्याचे प्रतिपादनही यावेळी राजकुमार परदेशी यांनी केले. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Advertisement