205 चिंचवड विधानसभा मतदार संघ
शबनम न्यूज / पुणे
मा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 19 -11-2020 चे पत्रानुसार तसेच मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्यावतीकरण करणे कार्यक्रम घोषित केला आहे. 205 चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या एकूण 491 यादी भागातील 7696 मतदारांची छायाचित्र मतदार यादी मध्ये दिसून येत नाहीत. सदर छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावांची यादी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची दूरध्वनी क्रमांकासह ही यादी जिल्हाधिकारी पुणे(www.pune.nic.in)व पिंपरी चिंचवड महानगरपालिका (www.pcmcindia.gov.in)या वेबसाईटवर माहिती करिता व संपर्क करिता उपलब्ध केलेले आहेत. ज्या मतदारांची छायाचित्रे मतदारयादीत नाही, त्यांनी त्यांचे अलीकडच्या काळातील दोन रंगीत छायाचित्र व रहिवास पुराव्यासह (लाईट बिल, गॅस पुस्तक, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक, पासपोर्ट इत्यादी) 205चिंचवड विधानसभा मतदार संघाचे कार्यालय यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, दुसरा मजला, क्षेत्रीय कार्यालय थेरगाव पुणे 33 येथे समक्ष अथवा दिनांक 3 जुलै 2021 शनिवार व दिनांक 4जुलै 2021 रविवार रोजी होणाऱ्या छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र गोळा करणे, विशेष शिबिरात खालील दिलेल्या मतदान केंद्रावर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन स्मिता झगडे (मतदान नोंदणी अधिकारी 205-चिंचवड विधानसभा मतदारसंघ) यांच्या कडून करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
ज्या मतदारांची या कालावधीत रहिवास पुरावा व छायाचित्र जमा होणार नाहीत. त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात करण्याबाबतची पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. तसेच 1 जानेवारी 2021 नंतर ज्या मतदारांनी नाव नोंदणी केलेली आहे. अशाच मतदारांचे मतदान ओळखपत्र वाटप खालील दिलेल्या मतदान केंद्रावर केले जाईल.
वरील शिबिर हे केवळ खाली नमूद केलेल्या यादीत भागांमध्ये असलेल्या मतदारांसाठी मर्यादित आहे. इतर या विभागातील छायाचित्र नसलेल्या मतदारांसाठी स्वतंत्र शिबीर यानंतर आयोजित करण्यात येईल. covid-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कोणत्याही खाली नमूद केलेल्या मतदान केंद्र व्यतिरिक्त इतर मतदान केंद्रातील किंवा 1-1-2020 पूर्वी मतदार नाव नोंदणी केलेल्या मतदारांनी कृपया गर्दी करू नये, अधिक माहिती करिता कार्यालयीन वेळेत कोमल टिक्के 8830511215 व अमर कांबळे 7020787881यांच्याशी संपर्क साधावा. असेही दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.