शबनम न्युज | पुणे
पुण्यातील लोणीकंदजवळील केसनांद येथे अज्ञातांनी घर फोडून २.२४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते १९ जानेवारी दरम्यान घडली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते १९ जानेवारी दरम्यान, घराच्या मालक बाहेर गेले असता, हा प्रकार घडला. घरी परतल्यानंतर ६८ ग्रॅम सोन्याचे दागिने गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर ५५ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलिसांत तक्रार दाखल केली. चोरटयांनी खिडकीचे कुलूप तोडून आता प्रवेश केला आणि चोरी केली. याबाबत अधिक तपास पुणे पोलीस करीत आहेत.
Advertisement