पिंपरी, ” रविवारी सुट्टी मग वाजवा रे शिट्टी ” सारख्या धडाकेबाज घोषणाबाजी करीत संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघ या पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी अक्षरशः पिंजून काढला. प्रचाराच्या शेवटच्यादिवशी दुचाकी रॅली काढत प्रचाराची सांगता झाली. या दुचाकी रॅलीत शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते. सर्वत्र शिट्टीचा आवाज घुमत होता. त्यामुळे रॅलीने मतदारांचे लक्ष वेधून घेतले. रविवारी शिट्टीचे बटन दाबण्याचा निर्धार चिंचवडमधील मतदारांनी केला आहे.
या फेरीची सुरवात चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरापासून झाली. उघड्या जीपमधून राहुल कलाटे मतदारांना अभिवादन करत होते. पाठिंबा दिलेल्या संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही दुचाकी रॅलीत सहभागी झाले होते. मतदारांकडून कलाटे यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिट्टीचे बटण दाबणार असे मतदार सांगत होते. रॅलीत दुचाकींची रांग होती. दुचाकीवर मागे बसलेले तरुण मुखामध्ये धरलेल्या रंगीबेरंगी शिट्ट्या वाजवून नागरिकांना मतदान यंत्रावरील दहाव्या क्रमांकाचे शिट्टीचे बटण दाबून राहुल कलाटे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन मतदारांना करीत होते. ना हा पक्ष, ना तो पक्ष, चिंचवड विधानसभेच्या विकासासाठी मी लढतोय अपक्ष असे कलाटे मतदारांना सांगत होते.
दुचाकी रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या उरात धडकी भरली असेल, अशा चर्चा कोपऱ्या-कोपऱ्यावर रंगल्या होत्या. फेरीतील शेकडो दुचाकी पाहून एका व्यावसायिकाने तर ” याला म्हणतात दुचाकी रॅली” अशी यथार्थ टिपण्णी केली. कोणतेही मोठे नेते नसताना अपक्ष लढत राहुल कलाटे यांनी मतदारसंघ पिंजून काढला. पदयात्रा, कोपरा सभा, बैठका, वैयक्तीक भेटीगाठी घेतल्या. जनतेनेही कलाटे यांना भरभरुन प्रतिसाद दिला.
क्रांतिवीर चापेकर चौकमार्गे दर्शन नगरी सोसायटीजवळील पुलावरून काळेवाडीमधील पंचनाथ चौकात दुचाकिफेरी आली. तेथून छत्रपती चौक, राहटणी येथे दुचाची रॅली पुढे तापकीर नगरमध्ये तरुणांनी जेसीबीवरून कलाटे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर पिंपळे सौदागर, वरुण पार्क सोसायटी येथेही पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर शिवार गार्डन-राहटणी, कोकणे चौक, शिवराज नगर-राहटणी, धर्मवीर संभाजी महाराज चौक, कस्पटे वस्ती येथे दुचाकी रॅली पोहोचली. वाकड येथे रॅलीची सांगता करत प्रचाराचीही सांगता झाली. एवढे कडक उन्ह असतानाही आपल्या लाडक्या राहुलदादांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी एकही कार्यकर्ता दुचाकी रॅलीतून निघून गेला नाही. शेवटपर्यंत सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या सर्व कार्यकर्त्यांचे कलाटे यांनी कौतुक, अभिनंदन केले.
माझी निवडणूक चिंचवडमधील जनतेनेच हातात घेतली. माझ्यासोबत कोणताही नेता नव्हता, जनता होती आणि आहे. जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला. ना हा पक्ष, ना तो पक्ष, चिंचवड विधानसभेच्या विकासासाठी मी अपक्ष लढतोय. चिंचवडमधील जनतेला बदला हवा आहे. चिंचवडची जनता नक्कीच बदेल करेल आणि प्रश्नांची जाण असलेल्या माझ्यासारख्या उमेदवाराला विधानसभेत पाठवेल. प्रचारात विरोधकांनी खोटी आश्वासने दिली, याची जनतेला जाणीव आहे. त्यामुळे या निवडणुकीत चिंचवडची जनता नक्कीत आपले बहुमल्य मत शिट्टीला देईल. जनतेच्या आशिर्वादाने आणि ताकदीने चिंचवडमध्ये इतिहास घडेल आणि माझा विजय होईल, अशी प्रतिक्रिया राहुल कलाटे यांनी प्रचाराच्या सांगतेनंतर दिली.