पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीत जेवढा वाटा स्थानिकांचा आहे तितकाच वाटा या परराज्यातील नागरिकांचा देखील असे प्रतिपादन पिंपरी विधान सभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केले चिंचवड मल्याळी समाजाच्या वतिने CMS कलामंदिर या नृत्य नाट्य वादन अकेडमीचा दिमाखदार उदघाटन सोहळा पार पडला या सोहळ्या चे उदघाटन आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले या वेळी ते बोलत होते.
या वेळी आपल्या भावना व्यक्त करतांना अण्णा बनसोडे यांनी सांगितले कि पिंपरी चिंचवड शहर हे मेट्रो पोलिटीयन शहर म्हणून नावारूपास येत आहे.या शहरातील वाढते उद्योगिकरण, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपन्या यामुळे या शहरात इतर राज्या मधून नागरिकांचे स्थलांतर होत आहे.पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीत जेवढा वाटा स्थानिकांचा आहे तितकाच वाटा या परराज्यातील नागरिकांचा देखील आहे.आपली भाषा संस्कृती ओळख जपत यांनी या शहराला व मराठीला देखील तितकंच प्रेम दिले आहे.केरळ मधील मल्याळी समाज हा देखील त्यापैकी एक.गेली अनेक वर्षे मल्याळी समाज पिंपरी चिंचवड शहरात गुण्या गोविंदाने नांदत आहे.चिंचवड मल्याळी समाज या संस्थेच्या माध्यमातून मल्याळी समाजाला एकत्रित ठेवण्याच काम संस्थेचे अध्यक्ष टी पी विजयन सर व त्यांचे सहकारी करत आहेत. केरळ ही देवभूमी म्हणून प्रसिद्ध आहे एक सुशिक्षित व कलाप्रेमी राज्य म्हणून केरळ कडे आदराने बघितलं जात त्यामुळे मल्याळी समाजामध्ये नृत्य,कला, नाट्य याबद्दल प्रचंड प्रेम व आवड आहे. .
यावेळी केरळ चे प्रसिद्ध तालवादक चेंदा, थंयबका,पंच वद्यम वाजवणारे व पद्मश्री पुरस्कराने सन्मानित माननीय श्री मत्तनूर शंकरनकुट्टी हे देखील उपस्थित होते.
चिंचवड मल्याळी समाज यांच्या मार्फत शैक्षणिक व सामाजिक कार्य मोठया प्रमाणात सुरू आहे आता या नवीन CMS कलामंदिर अकेडमीच्या माध्यमातून शहरातील कलाप्रेमी विद्यार्थ्यांना व नागरिकांना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध झाले आहे
.चिंचवड मल्याळी समाज संस्थेचे कार्य हे असेच सुरू रहावे या शब्दात आमदार अण्णा बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या व मल्याळी समाजाचे प्रश्न समजून त्यांच्यासाठी कार्य करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास दिला.
यावेळी चिंचवड मल्याळी समाजाचे अध्यक्ष टी पी विजयन,CMS भवनचे कामकाज बघणारे भास्करण,CMS स्कुल चे सुधीर नायर व संस्थेचे खजिनदार अजय कुमार यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी, मल्याळी समाजाचे व कलाप्रेमी नागरिक उपस्थित होते.