शबनम न्युज | पुणे
एम.पी.एस.सी. पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सोशल मीडियाच्या टेलिग्राम या ॲपवर लाखो विद्यार्थ्यांची संवेदनशील माहिती तसेच त्यांचे प्रवेश पत्र असा डेटा लिंक झाल्याची माहिती आहे. टेलिग्राम चॅनलवर सुमारे एक लाख विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटासह वैयक्तिक माहिती लिंक झाली असून, प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने दखल घेत यावर खुरासा केला आहे.
टेलिग्राम चॅनलवर सुमारे एक लाख विद्यार्थ्यांचे हॉल तिकिटाचा डेटा लिंक झाला आहे. हा फक्त नमुना डेटा आहे, तसेच आमच्याकडे सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांची अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे, असा दावा टेलिग्राम चैनल वर तयार करण्यात आलेल्या ग्रुप वर करण्यात आला. या माहितीमध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाइन पोर्टल लॉगिन, फी पावती, अपलोड केली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी आणि बरेच काही आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर तातडीने दखल घेत एक ट्विट केले आहे, या ट्विटमध्ये या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे. “महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी नियोजित विषयांकित परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्रे दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी आयोगाचे ऑनलाईन अर्ज प्रमाणेच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंगद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. यापैकी बाह्य लिंक द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवेश प्रमाणपत्र एका टेलिग्राम चैनल प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास आली. सदर बाह्यलिंगद्वारे निदर्शनास आल्यानंतर बाह्य लिंगद्वारे प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा बंद करण्यात आली. सदर चैनल वर प्रसिद्ध झालेली प्रवेश प्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिंक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली. तसेच सदर चॅनलवर उमेदवारांचा वैयक्तिक डेटा उपलब्ध असल्याचा तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून, अशाप्रकारे कोणताही डेटा अथवा प्रश्नपत्रिका लिंक झालेली नाही.