शबनम न्यूज’ प्रतिनिधी ;
दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे पुण्यात भयमुक्त रॅली अभियान राबविण्यात आले या मध्ये सिटी बजाव खुदको बचाव या अभियानात 700 ते 800 मुलींचा रॅलीमध्ये समावेश दुर्गा ब्रिगेड संघटना आणि पी ई एस मॉर्डन गर्ल्स हायस्कूल आणि यांच्या संयुक्त विद्यमानाने बालगंधर्व चौक ते डेक्कन जिमखाना भयमुक्त अभियान रॅली घेण्यात आली
सिटी बजाओ खुदको बचाओ या उपक्रमात 700 ते 800मुलींना शिट्टी वाटप करून रॅलीची सुरुवात करण्यात आली राणी लक्ष्मीबाई यांना पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करून डेक्कन जिमखाना येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकपाशी रॅलीचे सांगता करण्यात आली यावेळी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष कु दुर्गा भोर. श्री नंदकुमार एकबोटे मॉर्डन श्री अभय भोर पी इ एस मॉर्डन गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका . सौ माया नाईक डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिपिन हसबनीस साहेब उपमुख्यध्यापिका सुजाता तांबे पर्यवेक्षिका सौ वैशाली घोडके , दुर्गा ब्रिगेड चे शांतीलाल डांगी प्रमोद सुनीता देशमुख गायकवाड ,रुपाली परदेशी , हेमलता घुले, नीलिमा तायडे, रुपाली होनकळस, चंद्रभागा दराडे उपस्थित होते
कुमारी अवंतिका भोर, दिव्या कराडे सिद्धांत तिखे, या मुलींनी स्वाप्रशिक्षणार्थ लाठी काठी. प्रात्यक्षिक केली यावेळी दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर यांनी मुलींना संरक्षणार्थ प्रत्येक मुलीने प्रशिक्षित होऊन स्वतःची रक्षा स्वतःच करण्यासमर्थ व्हावे लागेल तसेच पुढील काळात प्रत्यक्ष शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुलींना स्व प्रशिक्षणार्थ ट्रेनिंग दुर्गा ब्रिगेड? संघटनेमार्फत देण्यात येईल मुलींनी कोणत्याही घटनेला सामोरे जाण्यासाठी कायम तत्पर आणि कणखर असले पाहिजे असे सांगितले दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या आणि कार्यकर्त्या विद्यार्थिनी मुली उपस्थित होत्या