शबनम न्यूज’ प्रतिनिधी ;
जमिनीच्या वादातून जेजुरीतील माजी नगरसेवक महेबूब सय्यदलाल पानसरे यांच्यावर कुऱ्हाड, तसेच कोयत्याने वार करुन खून केल्याची ढालेवाडीत घडली. या प्रकरणी परदेशी यांच्यासह साथीदारांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकास आरोपीना अटक करण्यात यश आले आहे वनीस प्रल्हाद परदेशी (सध्या रा. गुरुवार पेठ, पुणे, मूळ रा. ढालेवाडी, बेंदवस्ती, ता. पुरंदर, जि. पुणे), महादेव विठ्ठल गुरव उर्फ काका परदेशी (वय ६५, सध्या रा. ढालेवाडी, बेंदवस्ती, ता. पुरंदर, जि. पुणे, मूळ रा. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, सुरेंद्र जगदाळे, इश्वर आंधळे, शंकर संपते, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, चेतन आपटे, प्रदीप गाडे, पवन भोसले आदींनी ही कारवाई केली.